top of page
रक्तदान शिबीर
सर्व दानांमध्ये श्रेष्ठदान रक्तदान आहे. रक्तदान हे अनेकांना जीवन देणारे दान आहे. रक्तदान म्हणजेच जीवनदान!मे महिन्यात रक्तसंकलनाचे प्रमाण कमी असते, रक्तदाते बाहेरगावी गेल्याने, तरुण रक्तदात्यांचा परीक्षेचा कालावधी, त्याचप्रमाणे प्रचंड उन्हाळ्यामुळे रक्तदान शिबिरांचे आयोजनही तुलनेने कमी असते ,त्यामुळे रक्ताचा तुटवडा भासतो .हीच गरज ओळखून काजुपाड्याचा राजा तर्फे १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबिराला साधारण १०० ते १२५ लोंकानी रक्तदानासाठी पुढाकार घेतला आणि ६५ बाटल्या रक्तांचे योगदान आपण जमा करू शकलो.
bottom of page