मंडळाची माहिती
सन १९७८ साली गणेशचौक मैदानात सर्व गणेश कार्यकर्ते एकत्र येवून गणपती उत्सवाची सुरूवात केली. या सर्व कार्यात आजी व माजी सर्व कार्यकत्यांनी मोलाची कामे केली. दुर्देवाने काही कार्यकर्ते आज हयात नाही, याची आम्हाला खंत आहे. मंडळ अनेक अडचणींना व आर्थिक संकटांना तोंड देत सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत असून ह्यात सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभत आले आहे . हे मोलाचे कार्य येणाऱ्या पुढील कार्यकत्यांना कधीही विसरून चालणार नाही.
या ४७ वर्षात सर्व हितचिंतक,देणगीदार ,कार्यकर्ते, सभासद यांनी गणेशोत्सव मंडळास ४८ वर्षापर्यंत पोहोचविले त्या सर्वांचे जाहिर आभार सुवर्ण वर्ष्याकडे झेप घेताना श्री गणराया चरणी एकच मागणे मागतो की, हे गणराया मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना सद्बुध्दी देवो, या मंडळास अखंड एकता लाभू दे, अशी प्रार्थना करून आम्ही आमचे मनोगत पूर्ण करतो.